रत्नागिरी : बारावीचा निकाल काल जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी आजपासून (६ मे) २० मे पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार असून, त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking) याद्वारे भरता येणार आहे.
ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत व पुनर्मूल्यांकनासाठी व संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (mahahsscboard.in) स्वतः किंवा शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी ६ मेपासून ते २० मेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking) याद्वारे भरता येईल.
फेब्रुवारी-मार्च २०२५ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मुल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहीत नमुन्यात विहीत शुल्क भरून या विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्याने ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील, ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुर्नमुल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी या विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ठ होवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून, जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ व जून-जुलै २०२६) श्रेणी/ गुण सुधार योजना योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.
जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षाथी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी बुधवार दि. ०७/०५/२०२५ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.
…………………………………….
ADVT –
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


