कणकवली : शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज कणकवलीच्या बारावीच्या निकालामध्ये दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन करून आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखलेलीआहे. या यशामध्ये विज्ञान शाखेचा 100% निकाल लागलेला असून या शाखेत प्रथम क्रमांक कु. प्रांजली दत्तात्रय हिले (86.67%), द्वितीय क्रमांक कु. पारस अनिल परब (86%) व तृतीय क्रमांक साईश सतीश गावडे (85.17%), वाणिज्य शाखेचा निकाल 99.16 % लागला असून त्यामध्ये प्रथम क्रमांक कु. तन्मय संजय सावंत (94.33%), द्वितीय क्रमांक कु. शर्वरी सुहास असगेकर (92.83%) व तृतीय क्रमांक कु.तन्वी किशोर आरेकर (90.17%) कला शाखेचा निकाल 96.47% लागला असून त्यामध्ये प्रथम क्रमांक कु. रिया ज्ञानेश्वर भोगले (84.33%) द्वितीय क्रमांक कु. साक्षी संतोष सावंत 77% व तृतीय क्रमांक मेहेक युसुफ शेख (73.17%) आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल (96.29%) लागला असून त्यामध्ये प्रथम क्रमांक कु. नम्रता अरुण तेजम (81.67%), द्वितीय क्रमांक कु. मयुरेश सुनील कुबल (78.17%) व तृतीय क्रमांक कु. सुमेध शरदचंद्र जाधव (75.83%) आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शि. प्र. मंडळाच्या चेअरमन डॉ. सौ राजश्री साळुंखे, प्राचार्य युवराज महालिंगे, पर्यवेक्षक श्री. महादेव माने, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बारावीच्या निकालात कणकवली कॉलेज कणकवलीची उज्वल परंपरा कायम !
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


