सावंतवाडी : बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारभारात सर्व जाती धर्माचे लोक होते.त्यांना राजकारणात समान वागणूक होती.म्हणून महाराजांच्या स्वराज्याची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून तळागाळाच्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सामाजिक,आर्थिक व राजकीय समानता दिली.ज्या मनस्मृतीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक थांबवण्यात आला त्या अपमानाचा बदला बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी मनस्मृतीचे दहन करून घेतला;आणि हज़ारो वर्षापासून मनूवाद्यानी अस्पृश्य,शोषित,पिडित ,गरीब जनतेवर लादलेल्या बंधनातून मुक्त केले.म्हणून शिवाजी महाराजांचे स्वराज्य बाबासाहेबांनी संविधानाने लोकांना बहाल करुन छत्रपतींचा आदर्श जगासमोर ठेवला.;असे प्रतिपादन खेड येथील धम्मचारी प्रशील यांनी इन्सुलीच्या रमाईनगर येथील प.पू.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानात केले.

भीमगर्जना युवक मंडळ ,ईन्सुली रमाईनगर यांच्या वतीने १ मे रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी अभिवादन सभेचे अध्यक्ष धम्मचारी लोकदर्शी तर प्रमुख व्याख्याते म्हणून धम्मचारी प्रशील होते,तसेच गावच्या पोलिस पाटिल जागृती गावडे,ग्रामपंचायत सदस्या मेस्त्री,परब,ईन्सुली हायस्कूल चे शिक्षक शेवाळेसर,माजगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक चौरे सर,समुद्रे सर ,धम्मचारी विद्याकुमार,जयराम ठाकूर,युगनायक गोवा चे सदस्य गुरुदास विर्नोडकर,धम्ममित्र अनंत तांबोस्कर ,गौतम कांबळे इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होेेते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवारांच्या हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व बुध्द पुजापाठाने झाली.मान्यवरांचे स्वागत स्वागताध्यक्ष लाडु जाधव यांनी केले. तर महिलांनी स्वागतगीत सादर करुन सर्वांचे स्वागत केले.उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश जाधव यांनी तर आभार राहूल जाधव यांनी मानले.अध्यक्षीय मनोगतामध्ये अध्यक्षांनी नियोजनात सहभागी झालेल्यांना तसेच उपस्थितांना धन्यवाद देवून शुभेच्छा दिल्या. सायंकाळी वाडीतील महिला मुलांचे सास्कृतिक कार्यक्रम झाले.यामध्ये भीमगीते तसेच नृत्य अविष्कार व एकांकीका चे उत्तम सादरीकरण केले.हा जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी कृष्णा जाधव,अरविंद जाधव,अजय जाधव,आनंद जाधव,सदानंद जाधव,दिपक जाधव,सूर्यकांत जाधव,नितेश जाधव,दिपेश जाधव,बाबली जाधव,निलेश जाधव,स्वप्नील जाधव,दिलिप जाधव,योगेश जाधव,राघोबा जाधव,मिथील जाधव,सविता जाधव,संजना जाधव,अनुजा जाधव,दिपाली जाधव,भावना जाधव,वृषाली जाधव,सपना जाधव,स्म्रितिषा जाधव,अनघा जाधव,दिव्या जाधव,कृतिका जाधव,संघमित्रा जाधव,सृष्टी जाधव,शरयू जाधव,अम्रित जाधव,तन्मय जाधव इत्यादींनी विशेष सहाय्य केले.


