दोडामार्ग : उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताहनिमित्त सावंतवाडी विधानसभेत ‘शिवसेना संपर्क यात्रा अभियान’ विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून सुरू आहे. उद्या दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी ‘शिवसेना संपर्क यात्रा अभियान’ दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषदमध्ये साजरा होत आहे.
दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे..
आडाळी/मोरगाव स. ९.३० वा.
सासोली/पाटये पुनर्वसन स. १०.३० वा… सासोली जि. प.
झरेबांबर/काजूळवाडी स…माटणे.जि.प. ११.३० वा.
मांगेली दु. १२.३० वा.
सभागृह भूमिपूजन संध्या. तसेच खत वाटप कार्यक्रम..कोनाळ जि. प. उसप,2.30 वा.
पिकुळे संध्या. ३.३० वा. .. माटणे.. जि. प
साटेली भेडशी संध्या. ४.३० वा… कोनाळ. जि. प
आंबेली केळीचे टेंब संध्या. ५.३० वा… दोडामार्ग शहर..
सदर शिवसेना संपर्क यात्रेमध्ये जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा समन्वयक चंद्रकांत गावडे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला आघाडी विधानसभा संघटक सुकन्या नरसुले, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, प्रकाश गडेकर, तालुकाप्रमुख यशवंत परब, सावंतवाडी तालुका संघटक मायकेल डिसोजा, माजी जिल्हा परिषद सदस्य संपदा देसाई, जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा नगरसेवक चंदन गावकर. उपजिल्हा महिला संघटक विनिता घाडी, तालुका संघटक लक्षमण आयनोडकर, उपजिल्हा संघटक विजय जाधव आदि उबाठा सेनेचचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. तरी दोडामार्ग तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस, महिला तालुका संघटक श्रेयाली गवस, युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे आदींनी केले आहे.


