कुडाळ : ‘पिंगुळी मानाची दहीहंडी’ पिंगुळी गावातील सिद्धिविनायक स्पोर्ट्स (म्हापसेकर तिठा), युवा प्रतिष्ठान (करंगुटकरवाडी) श्री देव वडगणेश मित्र मंडळ आणि स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांच्या सहभागातून आयोजित केली असून, हि दहीहंडी रोख रक्कम २०,०२४ रुपयाची असून जे गोविंदा पथक सहा स्थर लावून सलामी देतील त्यांना रोख रक्कम 3,024 आणि सन्मान चिन्ह ,पाच थर लावून सलामी 2024 रोख रक्कम व सन्मान चिन्ह, तसेच चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 1024 व सन्मानचिन्ह देण्यात येईल दरम्यान या वेळेस सिंधुदुर्ग श्री. संदेश सावंत व अमित कदम यांचा बॉडी बिल्डिंग शो व प्रेक्षकांसाठी शरीरसौष्ठव संदर्भात टिप्स कार्यक्रम होणार आहे. निमंत्रित नृत्यांगनांचे नृत्य आविष्कारांसह, डॉल्बी dj चा थरार, फटाक्यांची भव्य आताषबाजी तसेच इतर मनोरंजनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळ– एमआयडीसी नाका, परब सर्विसिंग सेंटर बाजूला ,पिंगुळी म्हापस्केकर तिठा येथे आहे.आकर्षक विद्युत रोषणाई, जबरदस्त डीजे साऊंड असलेल्या पिंगुळी मानाच्या दहीहंडी सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येने गोविंदा पथक व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सर्व मंडळांच्या वतीने केले आहे.
गोविंदा पथके व स्पर्धकांसाठी संपर्क क्रमांक-
केतन 7558351540
सचिन 9637833638