बेळगाव : येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा.आनंद आपटेकर यांचा वाढदिवस सांबरा येथील माऊली लॉन्स येथे अनोख्या रीतीने नुकताच साजरा झाला. चवाट गल्लीतील देवदादा ज्योतीबा सासनकठी मंडळ, शिवजयंती मंडळ,बेळगावचा राजा गणेशोत्सव मंडळ, सावरकर ग्रुपसह विविध मंडळाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अन् त्यांना दीर्घायुष्य लाभण्याची कामनाही केली.. यावेळी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आपली साथ सदैव अशीच राहावी, अशी भावना व्यक्त केली.तुमचा हातुन गरिबांच्या कल्याण साठी रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा घडो ही जोतिबा चरणी प्रार्थना केली
प्रारंभी शिवबसव नगर येथील ज्योतिबा मंदिरात जाऊनआरती म्हणून मंदिराच्या परिसरात आपटेकर सर यांना चवाट गल्लीच्या वतीने पुष्पगुच्छ व श्रीफळ शाल देऊन सन्मान करण्यात आला.यानंतर माऊली लॉन येथे केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित लक्ष्मण किल्लेकर, सुनील जाधव,बाळू किल्लेकर,विनायक पवार, संदीप कामुळे, निशा कुंडे,अनंत बामणे,रोहन जाधव, श्रीनाथ पवार,सुधीर धामणेकर,अनंत हांगीरगेकर,जोतिबा पवार, सौरभ बामणे,निलेश गुंडकल, सत्यम नाईक, विशाल कुट्रे, अनिल गुंडकल,ओमकार मोहिते, सचिन बेळगावकर, राहुल जाधव,अभि नाईक, प्रभाकर जाधव, आकाश धुराजी, वृषभ मोहिते,विशाल गुंडकल,अप्पजी राडे,यासह अन्य उपस्थित होते.