वेंगुर्ले : येथील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये आसोली हायस्कूलच्या १७ वर्षाखालील कबड्डी संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले. यावेळी झालेल्या अंतिम फेरीत त्यांनी वेंगुर्ले हायस्कूल संघावर चुरशीने खेळी करत मात केली. दरम्यान त्यांची जिल्हास्तरावर निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापिका सौ. भावना धुरी, सहकारी शिक्षक श्री. सोनसुरकर आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले. या यशस्वी संघातील विद्यार्थ्यांना प्रशालेचा माजी विद्यार्थी नीरज पाटलेकर याचे मार्गदर्शन लाभले.
माध्यमिक विद्यालयातील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. यामध्ये विविध क्रीडा प्रकारातून वेंगुर्ले तालुकास्तरावर आसोली हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यात प्रशालेच्या कबडी संघाला मोठे यश मिळाले. अंतिम फेरीमध्ये आसोली हायस्कूल विरुद्ध वेंगुर्ले हायस्कूल अशा झालेल्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. शेवटी विजयी संघाने प्रतिस्पर्धी संघावर मात करत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केला. दरम्यान त्यांची जिल्हास्तरावर होणाऱ्या पुढील सामन्यासाठी निवड झाली आहे.
आसोली हायस्कूचा कबड्डी संघ ‘लई भारी’, वेंगुर्ले तालुकास्तरावर मारली बाजी.! ; विजेता ठरत जिल्हास्तरावर निवड, मान्यवरांकडून मिळवली कौतुकाची थाप.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


