नवी दिल्ली : भारताने मध्यरात्री पाकिस्तानात एअर स्ट्राइक केला. त्या संदर्भात आज सकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी या संपूर्ण ऑपरेशनची माहिती दिली आहे. पाकिस्तानात ज्या नऊ ठिकाणी एअर स्ट्राइक करण्यात आला. त्यासाठी टार्गेटची खूप विचारपूर्वक निवड करण्यात आली होती. आज या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी एअर स्ट्राइकची माहिती देताना पाकिस्तानला पुरतं उघड पाडलं. सगळे पुरावे दाखवले. 6 ते 7 मे च्या मध्यरात्री 1 वाजून 5 मिनिटाने ते 1.30 पर्यंत ही कारवाई करण्यात आली. पहलगाममधील हल्ल्यातील मृत नागरिकांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर करण्यात आलं.
पाकिस्तानमध्ये दहशतवादी तयार केले जात आहेत. पाकिस्तान आणि पाक अधिकृत पीओकेमध्ये हे अतिरेकी होते. त्याचे पुरावे दिले. इंटलिजन्स माहितीच्या आाधारे टार्गेट करण्यात आलं. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली.
पीओकेमधील टार्गेट –
सवाई नाला कॅम्प मुजफ्फराबाद – हा लष्करच ट्रेनिंग तळ होता. पहलगाम, गुलमर्ग हल्ल्यातील दहशतवाद्यांनी इथेच प्रशिक्षण घेतलं होतं. या हल्ल्यातील अतिरेक्यांनी इथूनच प्रशिक्षम घेतलं होतं.
सयदना बिलाल कॅम्प – मुझफ्फराबाद जैश-ए-मोहम्मदचा एरिया आहे. जंगल प्रशिक्षण केंद्र होतं.
कोटली कॅम्प – एलओसीपासून ३० किलोमीटर दूर. लष्करचा बेस होतं. राजोरीत सक्रिय होतो. पुछमधील हल्ला येथूनच तयार झालेल्या अतिरेक्यांनी केला होता.
बर्नाला कॅम्प – भिमभेर एलओसीपासून ९ किलोमीटर दूर आहे. हत्यार हँडलिंग, जंगल प्रशिक्षण केंद्र आहे. अब्बास कॅम्प कोटली – एलओसीपासून १३ किलोमीटर दूर, लष्करचे फियादीन इथे तयार व्हायचे. १५ अतिरेकी राहण्याची सोय.
पाकिस्तानच्या आतील टार्गेट
सर्जल कॅम्प सियाल कोट – अंतराराष्ट्रीय सीमेपासून सहा किलोमीटरवर आहे. मार्च २०२५ मध्ये पोलिसांच्या चार जवानांची हत्या केली. त्या अतिरेक्यांना इथेच तयार केले.
महनूमा जाया कॅम्प सियालकोट – १८ ते १२ किलोमीटर आयबीपासून दूर आहे. हिज्बूलचं केंद्र पठाण कोटचा हल्ला इथूनच झाला.
मर्कस तायबा मुरीदके – आयबीपासून १८ ते २५ किलोमीटरवर आहे. मुंबईवरील हल्ल्याचे अतिरेकी इथेच तयार झाले. कसाब आणि डेव्हिड हेडली इथेट ट्रेन झाले होते.
ADVT –
डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!


