सावंतवाडी : आज बुधवार दिनांक 07.05.2025 रोजी सकाळी 7.30 वा.सावंतवाडी पोलीसांकडून नेमळे गावात नेमळे ग्रामपंचायत ते सातेरी मंदिर पर्यंत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली.

सदर रॅली मध्ये सावंतवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले, नेमळे बिट अंमलदार धोत्रे, पोलीस कॉन्स्टेबल गलेले, भूषण भोवर, नेमळे सरपंचा दीपिका भैरे, उपसरपंच सखाराम राऊळ, पोलीस पाटील रमेश नेमळेकर, तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर राऊळ नेमळे आरोग्य सेवक, आशा सेविका,अंगणवाडी सेविका प्राथमिक माध्यमिक शिक्षक वृंद विद्यार्थी ग्रामपंचायत कर्मचारी सदस्य, गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने रॅलीत सहभागी झाले होते सदर रॅलीत अमली पदार्थ विरोधी घोषणा देण्यात आल्या व पोलीस निरीक्षक कातिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातेरी मंदिर समोर सर्वांनी अमली पदार्थ विरोधी शपथ घेतली


