Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

दहीहंडीचा सण सुरक्षितपणे साजरा व्हावा : समाजसेवक राजू मसूरकर यांचे आवाहन.

सावंतवाडी : राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे. यासाठी तरुणांना आकर्षित करून दहीहंडी फोडण्यासाठी काही मंडळांकडून तसेच विविध पक्षाच्या राजकीय पक्षाकडून लाखो रुपयाची बक्षीस आहेत. हिंदू धर्मातील कार्यक्रम अवश्य साजरा करावा. परंतु, उच्च न्यायालयाने घातलेल्या निर्देशाचे पालन करून दहीहंडी फोडण्यात यावी, बालकांना दिलेली वयोमर्यादा पाळावी असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी केले आहे. त्या प्रकारच्या सूचना स्थानिक पोलीस निरीक्षकांकडून संबंधितांना देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे त्यांनी केली आहे

 

गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने राज्यामध्ये व जिल्ह्यामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे. यासाठी तरुणाला दहीहंडी फोडण्यासाठी काही मंडळांकडून तसेच विविध पक्षाच्या राजकीय पक्षाकडून तरुणांना आकर्षित करण्यासाठी लाखो रुपयाची बक्षीस आहे देण्यात येणार आहे. यासाठी हिंदू धर्मातील कार्यक्रम अवश्य साजरी करावी परंतु तरुण व युवकांना उच्च न्यायालयाने घातलेल्या निर्देशाचे पालन करून दहीहंडी फोडण्यासाठी थर लावण्याची तसेच लहान बालकांना वयोमर्यादा दिली असून यामुळे कुठलाही व्यक्ती दहीहंडी फोडताना अपघाती होऊन अपंगत्व येऊ नये किंवा मृत्युमुखी पडू नये याची काळजी सर्वसामाजिक मंडळाकडून अशी राजकीय पक्षाकडून आकर्षित लाखो रुपयांची बक्षीस हे लावून आकर्षित करून जीव घेणे प्रकार थांबले पाहिजेत. याची काळजी सर्व पक्षाकडून तसेच सामाजिक मंडळाकडून घेतली पाहिजे याचे निर्देश प्रत्येक तालुक्याच्या पोलीस निरीक्षक मार्फत सर्व मंडळ व पक्षांना तशा प्रकारचे सूचना देण्यात याव्या व उच्च न्यायालयाने घातलेल्या शर्तीचे पालन करावे तसे न केल्यास त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो याची कल्पना देण्यात यावी कारण एखादा कुटुंबातील तरुण व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास किंवा अपंगत्व झाल्यास या कुटुंबाची जबाबदारी त्या युवकावरती असते पुढील आयुष्य कठीण परिस्थितीतून त्या कुटुंबाला जावे लागते याचे भान आकर्षित बक्षिसे लावणाऱ्या मंडळावरती किंवा पक्षांकडून होत नाही यासाठी हिंदू धर्माचा सण अवश्य आनंदात साजरा करावा परंतु कुठल्या व्यक्तीला दहीहंडी फोडण्यासाठी उंचीचा थर ज्यादा लावल्याने जीव घेणे प्रकार असे अपंगत्व कायमस्वरूपी येऊ नये, याची काळजी घेण्यात यावी अशी मागणी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र प्रभाकर मसूरकर यांनी केली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles