सावंतवाडी : येथे बदलापूर घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. बदलापूर येथे गेल्या आठवड्यात शाळकरी मुलीवर अमानुष अत्याचार झाला. सदर घटनेचा आज राज्यभर महाविकास आघाडी व इतर सामाजिक संघटनांकडूनही निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान सावंतवाडी येथेही उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली सदर घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा बाळा गावडे, तालुका संघटक मायकेल डिसोजा, महिला आघाडी प्रमुख भारती कासार, उपतालुकाप्रमुख आबा सावंत, विभाग प्रमुख सुनील गावडे, महिला आघाडी शहर संघटक श्रुतिका दळवी, कल्पना शिंदे, विनोद ठाकूर, बाळू गवस, अशोक धुरी आदि पदाधिकारी उपस्थित होते.