जैसलमेर : राजस्थानच्या जैसलमेरमध्ये भारताने ड्रोन हल्ला हाणून पडला आहे. तर रामगड परिसरात देखील काही बॉम्बचे तुकडे सापडलेले आहेत. यासंदर्भात रामगड पोलिसांनी अधिकच तपास सुरू केला आहे.
पाकिस्तानकडून भारताच्या सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले केले जात आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने कालपासून भारतावर मिसाईल आणि ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. मात्र हे सगळे हल्ले भारतीय लष्कराकडून हवेतच हाणून पाडले जात आहे. जैसलमेरमध्ये देखील असाच एक ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उलथून टाकला आहे. यासंदर्भात रामगड पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
Published on: May 09, 2025 05:00 PM


