Thursday, December 25, 2025

Buy now

spot_img

राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ११ मे रोजी होणार पूजन.! ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांची लाभणार उपस्थिती.

कणकवली : मालवण- राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आला. शिवराय या पुतळ्याचे रविवार 11 मे रोजी पूजन करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सार्वजिनक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे 12 वा. येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मंत्री राणे म्हणाले, राजकोट येथील ज्या पद्धतीने शिवरायांचा पुतळा पडण्याची घटना झाली. त्यामुळे काळा ठपका लागला होता. मात्र, आता भव्य दिव्य शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे. शुक्रवारी शिल्पकार राम सुतार हे पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आले होते. नवीन पुतळा वर्षानुवर्षे पुतळा पाहायला मिळेल. सर्वांना अभिमान वाटेल असे त्याचे काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारच्या पहिल्या 100 दिवसांत या पुतळा काम हाती घेतले. सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठ्या ताकदीने हा पुतळा उभारला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यानंतर पूजन झाल्यानंतर आरती होणार आहे.
शिवसृष्टी उभारणार
राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याचा परिसरात आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनखाली शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जागेची हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवसृष्टीसाठी 100 कोटीची निधीची तरतूद करण्यात आली आहे. पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण काम महायुती सरकार करेल. तसेच जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद केली जाईल, असेही पालकमंत्री राणे म्हणाले.
दोडामार्ग तालुक्यातील मदरसामध्ये तलवारी सापडल्या होत्या. त्यामुळे आवश्यक भासली तर जिल्ह्यातील सर्व मदरसामध्ये सर्च आॅपरेशन करण्यात येईल. तसेच मदरशाच्या खऱ्या अर्थाने शिक्षणासाठी वापर करता येईल का, यादृष्टीने आमचे सरकार प्रयत्न करेल. बांग्लादेशी तसेच बाहेरील देशातील कोण व्यक्ती जिल्ह्यात आहेत का ? त्यादृष्टीने चौकशी केली जाईल.
बाहेरील देशांतील महिलांनी आपल्या देशातील पुरुषांशी विवाह केले असतील तर त्याबाबत केंद्र सरकार धोरण निश्चित करेल. त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles