Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

भारत – पाक युद्ध – हिना खानची ‘ही’ पोस्ट व्हायरल होताच सर्वत्र खळबळ !

मुंबई : टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा सामना करत आहे. अभिनेत्री कायम स्वतःच्या प्रकृतीची अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते. पण आता हिनाने तिच्या प्रकृतीबद्दल नाही तर, भारत – पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावग्रस्त वातावरणाबद्दल मोठं वक्तव्य केलं. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. काश्मीर येथे राहणारी हिना म्हणाली भारताने युद्धाला सुरुवात केली नाही.

हिना म्हणाली, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याला उत्तर देणं फार गरजेचं होतं. माझा भारतीय सैन्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. पण अभिनेत्रीने असंही म्हटलं की, दोन्ही देशांमधील परिस्थिती आणखी बिघडू नये असं तिला वाटतं. शुक्रवारच्या, हिनाने अल्लाहला प्रार्थना केली, जे चुकीच्या मार्गावर गेले आहेत त्यांना योग्य मार्ग दाखवावा. पोस्टनंतर मात्र हिनाला ट्रोलींगचा सामना करावा लागत आहे.

ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत हिना म्हणाली, ‘मला नेहमीच सीमेपलीकडून फक्त प्रेम आणि आपुलकीचा अनुभव आला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’पूर्वी आणि नंतर मला माझ्या देशावर प्रेम आहे. अनेकांनी मला दोष दिला, मला शिव्या आणि धमक्या देखील दिल्या…’

‘अनेकांनी मला अनफॉलो करण्याची धमकी दिली आहे. अश्लील कमेंट आणि तिरस्कार व्यक्त करताना दिसत आहेत. माझा आजार, कुटुंबावर, धर्मावर देखील निशाणा साधला आहे. मी माझ्या देशासोबत आहे. कदाचित हाच फरक आहे, जर मी भारतीय नसती तर मी काहीच नसती. तुम्हाला जे काही करायचं आहे करा. मला काहीही फरक पडत नाही आणि त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. मी कोणाला वाईट बोलली नाही किंवा कोणाचा अपमान केला नाही. मी फक्त माझ्या देशाची बाजू घेतली आहे.’ असं देखील अभिनेत्री हिना खान म्हणाली. हिना खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles