कणकवली : भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे पुरस्कृत आणि भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आयोजित ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या भव्य दहीहंडी उत्सवाला प्रसिद्ध सिने अभिनेते सोनू सूद उपस्थित राहणार आहेत.सोनू सूद हे तमिळ, तेलुगु, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहेत. कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानावर ही दहीहंडी होणार आहे.त्यासाठी प्रथम पारितोषिक ५,५५,५५५/- रोख रुपये ठेवण्यात आले आहे.
शुक्रवार ३० ऑगस्ट २०२४ रोजी उपजिल्हा रूग्णालय कणकवली समोरील पटांगणावर आमदार श्री. नितेश राणे पुरस्कृत भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२४ पुरुष व महिलांसाठी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला खासदार श्री. नारायणराव राणे , सिंधुदुर्ग पालकमंत्री श्री. रवींद्रजी चव्हाण , माजी खासदार श्री. निलेशजी राणे , जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी, माजी आमदार श्री. प्रमोद जठार तसेच मराठी हिंदी सिनेसृष्ठीतील नामवंत कलाकारांच्या उपस्थिती तसेच मुंबई येथील सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्राची संगीत रजनी होणार आहे.
४ था थर – ३०००/- रोख रुपये, ५ वा थर ५०००/- रोख रुपये, ६ वा थर – ७०००/- रोख रुपये, ७ वा थर २०,०००/- रोख रुपये, ८ वा थर २५,०००/- रोख रुपये व दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाला सायकल तसेच सर्व सहभागी संघांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
सिने अभिनेते सोनू सूद कणकवलीत येणार, आमदार नितेश राणे पुरस्कृत दहीहंडी उत्सव गाजणार ; ३० ऑगस्ट रोजी होणार भव्य दहीहंडी उत्सव.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


