सावंतवाडी : भारतीय बौद्ध महासभा शाखा सावंतवाडीच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2569 वी जयंती अर्थात वैशाख पौर्णिमा सोमवार दिनांक 12 मे रोजी विविध कार्यक्रमाने साजरी केली जाणार आहे. सावंतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार, त्यानंतर धम्म ध्वजारोहण, समता सैनिक दलाची मानवंदना ,पंचशील सूत्र पठन व त्यानंतर कणकवली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी श्रामनेर तथा बौद्धाचार्य गोपीकृष्ण पवार यांचे धम्म प्रवचन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला विभागाच्या अध्यक्ष मीनाक्षी तेंडुलकर राहणार असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बौद्ध बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शाखेचे अध्यक्ष विजय नेमळेकर, सरचिटणीस चंद्रशेखर जाधव यांनी केले आहे.


