सावंतवाडी : रविवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी सिंधु वेद रिसर्च फाऊंडेशनतर्फे चुनवरे तळेवाडी गावात धाकूराव सदन ; घर नं. ३५३ येथे मोफत आरोग्य शिबीर राबविण्यात आले. ह्याच शिबीराचा पाठपुरावा म्हणून १२ मे २०२५ रोजी “फॅालॅाव अप कॅम्प” घेण्यात आला. शिबीराचे उद्घाटन श्री. रमाकांत परब, श्री. मनोहर परब, श्री. रघुनाथ परब व श्री. नंदकिशोर परब इत्यादी गावातील ज्येष्ठ नागरीकांतर्फे करण्यात आले; तसेच डॅा. सुनिल परब, श्री. योगेश परब व सौ.नेहा पवार ह्यांचा शिबिराच्या व्यवस्थापनात पुढाकार होता. या शिबिरात डॅा. प्रशांत पवार यांनी गावातील सर्व नागरीकांची वैद्यकिय तपासणी , डायबेटिस, रक्तदाब तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी करून त्यांना प्राथमिक उपचार तसेच आहार – विहाराबाबत मौल्यवान मार्गदर्शन दिले.
सदर शिबिराला ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. तसेच शिबिर आयोजन करून गावातील गोरगरीब जनतेला मोलाचे सहकार्य केल्याने आयोजकांचे आभार मानण्यात आले. सिंधु वेद रिसर्च फाऊंडेशनचे काम असेच सुरू राहून लोकांना त्याचा लाभ मिळावा अशी सदिच्छा देखील ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.
सिंधु वेद रिसर्च फाऊंडेशनतर्फे चुनवरे येथे घेतला ‘फॅालॅाव अप कॅम्प’ ; ५ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आले होते मोफत आरोग्य शिबीर.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


