- वर्गमित्र परिवाराकडून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचा करण्यात आला सत्कार !
- सावंतवाडी : आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थी वर्गमित्र परिवाराचा चौथा स्नेहमेळावा आजगाव हायस्कूलच्या सभागृहात अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी प्रथम दीपप्रज्वलन करून सरस्वती देवीस व स्व. गुरुवर्य सामंत सरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच उपस्थित वर्गमित्रांचे स्वागत करण्यात आले.

- दरवर्षी प्रमाणे सन १९९२-९३ च्या माजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी आम्ही वर्गमित्र हे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षी आम्ही वर्गमित्र परिवाराकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. याही वर्षी स्नेहमेळावातून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा चाफा कलम , शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी सेजल गावडे ,काजल मुळीक मयुरी नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

स्नेहमेळाव्यात प्रथम प्रशालेच्या सर्वच गुरुजनांना वंदन करून शाळेतील आठवणींना उजाळा देऊन प्रत्येकाने आपले अनुभव कथन केले तसेच आपला वर्गमित्र परिवार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.यापुढेही गुरूंकडून मिळालेले सदविचार त्यांचा आशीर्वाद यापुढेही कायम राहील व शाळेसाठी,सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देत राहतील अशीच सर्वांनी भावना व्यक्त केली.शाळेसाठी आम्ही वर्गमित्र परिवार यापुढेही सहकार्य करेल तसेच शाळेच्या प्रगतीसाठी नक्कीच सर्वजण मिळून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी दिनानाथ काळोजी, राजेश आजगावकर, आनंद आरोलकर, राजेश नाणोसकर, रुपेश पालयेकर, स्नेहा वराडकर, तुकाराम वाघाटे प्रवीण केरकर, बाबाजी गोवेकर, लक्ष्मी देऊलकर, मनीषा गोवेकर, प्रतीक्षा परुळेकर, मनीषा कुडाळकर, शैलजा परब ,रवींद्र नाईक,महेश झांट्ये,संतोष चराटकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक उत्तम भागीत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तुकाराम वाघाटे यांनी अल्पोपहार तर दिनानाथ काळोजी यांनी भोजनाची सोय केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनीषा गोवेकर तर आभार दिनानाथ काळोजी यांनी मानले.




