सावंतवाडी : मळेवाड येथील अनुष्का लवू सातार्डेकर हिने बारावी सायन्समध्ये नवोदय विद्यालय सांगेली येथे प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल तीच सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. अनुष्काच्या यशाबद्दल तिच्या आई – वडिलांनी तिला पेढा भरवून तिचे कौतुक केले.
कु. अनुष्का लवू सातार्डेकर इयत्ता ५ वी मध्ये जि. प. पू. प्राथमिक शाळा मळेवाड नंबर २ येथे शिकत होती. सन २०१७ – १८ ला तिची नवोदय सांगेली येथे निवड झाली. ह्यानंतर इयत्ता १० वी सन २०२३ मध्ये तिला ९५ % गुण मिळाले होते. त्यानंतर २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षात ८५ % गुण मिळवून नवोदय विद्यालय सांगेली येथे प्रथम येण्याचा मान मिळवल्याने तिचे आई-वडील तसेच सातार्डेकर परिवार, सरपंच व उपसरपंच, मित्रमंडळी, गुरुजन वर्गांकडून, ग्रामस्थांकडून तिचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले.