कणकवली : येथील कणकवली महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये विविध खेळ प्रकारामध्ये १९ वर्षाखालील मुले व मुलींनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.
या मध्ये कुस्ती, फेन्सिंग, इपी, सेबर, फॉइल, जलतरण,बॅडमिंटन, तेनिकॉइड या स्पर्धेमध्ये मिळवलेल्या यशामुळे विद्यार्थ्यांची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामध्ये तन्वी पारकर ( कुस्ती), मीरा नवरे (जलतरण ), यशिक महाडेश्वर (फॉइल), प्रचिती घाडीगांवकर ( मल्लखांब)सदर विद्यार्थ्यांनी ची निवड कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी झालेले आहे.
जिल्हास्तरीय निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक जे.बी. कसालकर यांचे
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव श्री विजयकुमार वळंजू ,सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य युवराज महालिंगे , प्र.पर्यवेक्षक महादेव माने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
जिहास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कणकवली कॉलेजचा धमाका. ; विविध क्रीडा प्रकारांत सुयश.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


