Wednesday, July 9, 2025

Buy now

spot_img

चाकरमान्यांच्या सेवेसाठी आमदार नितेश राणे ४ सप्टेंबरला सोडणार मोफत ‘मोदी एक्सप्रेस’. ; बुकिंगसाठी भाजपा मंडल अध्यक्षांकडे संपर्क साधण्याचे आ. राणे यांचे आवाहन.

. दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरुन सुटणार रेल्वे.

. सातत्यपूर्ण सेवेचे यंदाचे १२ वे वर्षे

कणकवली : कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी दरवर्षीप्रमाणे चाकरमान्यांसाठी मोफत मोदी एक्सप्रेस ही रेल्वे सोडणार आहेत. ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरुन ही रेल्वे सुटणार आहे. आमदार नितेश राणे यांनी चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोफत प्रवासाची सेवा देण्याचे हे १२ वे वर्ष आहे. याबाबतची घोषणा स्वतः आमदार नितेश राणे यांनी नुकतीच केली. प्रवासादरम्यान सर्वांना मोफत भोजन आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या मोफत मोदी एक्सप्रेस मधून गणपतीला गावी जाणाऱ्या चाकरमान्यांनी बुकिंगसाठी कणकवली, देवगड, वैभववाडी या तालुक्यातील भाजपा मंडल अध्यक्षांकडे संपर्क साधावा.२८,२९,३० ऑगस्ट रोजी तिकीट बुकिंग करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्याला नाचत,वाजत -गाजत आपल्याला गावी जायचे आहे,तरी चाकरमान्यांनी त्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन भाजपा आ.नितेश राणे यांनी केलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles