Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

सलमान खानच्या अडचणीत मोठी वाढ ! ; भाईजानसोबत ‘हे’ ३ सेलिब्रिटी कायद्याच्या कचाट्यात !

जयपूर : राजस्थान उच्च न्यायालयाने 1998 मधील काळवीट प्रकरणात शुक्रवारी निर्देश जारी केले. जवळपास 27 वर्षे जुन्या या प्रकरणात आता 28 जुलै रोजी उच्च न्यायालयात सलमान खानसह सैफ अली खान, नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि दुष्यंत सिंह यांच्या अपीलवर सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान उच्च न्यायालयात शुक्रवारी या प्रकरणावर सरकार आणि विश्नोई समाजाच्या अपीलांवर सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती मनोज गर्ग यांच्या खंडपीठाने केली आणि हे प्रकरण राज्य सरकारकडून ‘लीव टू अपील’ अंतर्गत सादर करण्यात आलं.

या सुनावणीत सलमान खानशी संबंधित सर्व प्रकरणांना एकत्रितपणे यादीबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 28 जुलै रोजी होणार आहे. या सुनावणीमध्ये अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्बू यांना निर्दोष घोषित करण्याविरोधात राज्य सरकारची अपील आणि सलमान खान प्रकरणातील अपील यांचा समावेश आहे.

सलमान खानला झालेली 5 वर्षांची शिक्षा

काळवीट शिकार प्रकरण 1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचा आहे. 5 एप्रिल 2018 रोजी सब-ऑर्डिनेट न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवले होतं आणि त्याला 5 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती, तर त्याचे सहआरोपी इतर अभिनेते आणि एक स्थानिक रहिवासी दुष्यंत सिंह यांना निर्दोष घोषित करण्यात आलेलं.

निर्णयानंतर सलमान खानने सेशन कोर्टात शिक्षेविरोधात आव्हान दिलं होतं. त्याचबरोबर, राज्य सरकारने सहआरोपी कलाकारांना निर्दोष घोषित केल्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका स्वीकारली आणि संबंधित पक्षांना नोटीस जारी केल्या. आता याप्रकरणी पुढील सुनावणी 28 जुलै रोजी होणार आहे.

काळवीट शिकार प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर, प्रकरणात सलमान खान, सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि अभिनेत्री नीलम यांच्यावर शिकारीप्रकरणी वेगवेगळे खटले दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात सलमान खान मुख्य आरोपी आहे, तर इतर कलाकार सहआरोपी आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles