सावंतवाडी : आंबोली चेकपोस्ट येथे सकाळी ८.३० च्या सुमारास गोवा ते गुजरात जाणारे वाहन क्रमांक GJ 19/Y/5098 महिंद्रा pick up या वाहनाची तपासणी करत असताना वाहनात पत्र्याचे कंपार्टमेंट बंद असल्याने ते cut करून तपासले असता त्यामध्ये गोवा बनावटीचे Royal malt Whisky चे ११० box मिळून आल्याने आरोपी शैलेश कुमार रामाभाई बारिया (राह. जिल्हा पंचमहाल, गुजरात) याचेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एकूण दारू – 6,33,600/-
वाहन किंमत -10,00,000
एकूण – 16,33,600/-
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री . सौरभकुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री
कृषीकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस निरीक्षक श्री अमोल चव्हाण व आंबोली दुरक्षत्र अंमलदार पो. हवालदार रामदास जाधव, लक्ष्मण काळे, पोलिस नाईक मनिष शिंदे, होमगार्ड आनंद बरागडे व चंद्रकांत जंगले यांनी आंबोली चेकपोस्ट येथे केली.
आंबोली चेकपोस्ट येथे अवैध दारुसह 16 लाख 33 हजाराचा मुद्देमाल जप्त.! ; गुजरात राज्यातील एक जण ताब्यात .
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


