Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img

पत्रकारांचे प्रश्न सरकारकडे सकारात्मक दृष्टीने मांडणार.! : पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही. ; पत्रकार ,लोकप्रतिनिधी त्यांच्यातील सकारात्मक संवादातून महाराष्ट्र सर्वांगीण विकासात पुढे जाईल.! :  पालकमंत्री मंत्री नितेश राणे.

आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अभिवादन सभेत मंत्री नितेश राणे यांनी मांडले विचार.

– अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ यांच्या वतीने झाली अभिवादन सभा

सिंधुदुर्गनगरी : पत्रकार समाजाचा आरसा आहे. महाराष्ट्र राज्याला विकासाच्या योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी पत्रकार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात योग्य संवाद,तुम्हा सर्व पत्रकारांची सकारात्मक साथ निर्माण करून चालणे ही आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आणि तसेच सकारात्मक काम महाराष्ट्रात होईल असा विश्वास मस्त व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.


अनेक लोकप्रतिनिधी हे पत्रकारांच्या योगदानामुळेच घडलेले आहेत. समाजाच्या जडणघडणेत पत्रकाराचा फार मोठा वाटा आहे.असेही ते म्हणाले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ यांच्या विद्यमाने येथील पत्रकार भावनांमध्ये या अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. दर्पणकार बाळशास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ही अभिवादन सभा झाली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अनिल पाटील, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख, किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, माजी अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर शरद काटकर, मन्सूर शेख, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आधी पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री नितेश राणे म्हणले, अखिल भारतीय पत्रकार परिषदेने ज्या ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत नेऊन सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आलात तसेच पुन्हा पुन्हा येत जा बा शास्त्री जांभेकर यांची जन्मभूमी असलेल्या पोंभुर्ले येथे वेगळ्या पद्धतीने विकासात्मक दृष्टी ठेवून काम करण्या मनोदय पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त करतानाच राज्यातून येणारा पत्रकाराला पोंबुर्ले येते आल्यानंतर हेवा वाटला पाहिजे असे काम करू सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे ओरोस येतील भवन आधुनिक टेक्नॉलॉजीने सुसज्ज करण्याचा आपला प्रयत्न आहे. असेही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
काळ बदलला तशी पत्रकारिता बदलत चालली, जुन्या पत्रकारांची पत्रकारिता आणि सध्याची पत्रकारिता यात फरक पडू लागला. कारण ही आताची गरज सुद्धा तशी आहे. असे असेही मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. सिंधुदुर्ग नगरीतील पत्रकार भवन येथे झालेल्या आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर अभिवादन सभेत बोलताना केले.
राज्यभरातून जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष, अधिस्वीकृती समिती सदस्य अध्यक्ष, राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी, विविध वृत्तपत्रांचे आवृत्ती प्रमुख संपादक यांनी या अभिवादन सभेत सहभाग घेतला. परिषद प्रतिनिधी गणेश जेठे यानी स्वागत व सूत्रसंचालन करताना अनेक उदाहरणे देत या अभिवादन सभा शेवटपर्यंत खुलवत ठेवली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles