सहवेदना – उदय वाडकर यांचे निधन.

सावंतवाडी : शहरातील उभा बाजार परिसरातील रघुनाथ मार्केट येथे गेली अनेक वर्षे प्रोफेशनल कुरिअरचे प्रतिनिधी म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावणारे उदय वाडकर (वय ६१) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने सावंतवाडीतील व्यावसायिक तसेच सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

गेले काही दिवस ते आजारी होते. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे आणि ग्राहकांशी जपलेल्या आत्मीय संबंधांमुळे त्यांनी शहरात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील नागरिकांनी दुःख व्यक्त केले.

ते उत्तम वाडकर यांचे धाकटे बंधू होत. त्यांच्या पश्चात भाऊ, बहिणी, भावोजी, पुतण्या तसेच अन्य आप्तस्वकीय असा मोठा परिवार आहे.

त्यांच्यावर आज सकाळी सावंतवाडी येथील उपरल स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles