– २९ जुलै रोजी विविध धार्मिक, प्रबोधनात्मक आणि स्वसंरक्षणविषयक कार्यक्रम
सिंधुदुर्ग : सनातन संस्थेतर्फे यंदाचा ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी देशभरातील ८९ ठिकाणी आयोजित करण्यात आला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, देवगड, मालवण आणि वेंगुर्ले या सहा ठिकाणी हा महोत्सव उत्साहात साजरा होणार आहे.
संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, देशासमोर विविध सामाजिक व राष्ट्रीय स्वरूपाची आव्हाने उभी आहेत. अशा परिस्थितीत भारतीय गुरु-शिष्य परंपरेतून समाजाला योग्य दिशा मिळावी आणि राष्ट्र-धर्म जागृतीचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने यंदाचा गुरुपौर्णिमा महोत्सव ‘रामराज्याच्या निर्मितीची दिशा स्पष्ट करणारा उत्सव’ या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सवात श्री व्यासपूजन, परात्पर गुरु भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सनातन संस्था व संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या कार्यावर आधारित लघुपट, धर्मरक्षक व हिंदुनिष्ठांचा सत्कार, राष्ट्रभक्त व धर्मनिष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शन, स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके, सामूहिक नामजप तसेच ‘रामराज्य अर्थात हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष आणि दिशा’ या विषयावर विशेष मार्गदर्शन होणार आहे.
याशिवाय ग्रंथप्रदर्शन, राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शन आदी उपक्रमही आयोजित करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव –
देश-विदेशातील भाविकांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड आणि मल्याळम् भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी भाषेतील महोत्सवाचा लाभ पुढील लिंकवरून घेता येईल :
https://www.sanatan.org/mr/gurupurnima
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महोत्सवाची ठिकाणे व वेळा –
देवगड : श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, जामसंडे – दुपारी ३.३० वा.
कणकवली : मातोश्री मंगल कार्यालय, नवरे हॉस्पिटलसमोर – दुपारी ३.०० वा.
कुडाळ : मराठा समाज भवन सभागृह, कुडाळ हायस्कूलजवळ – दुपारी ३.३० वा.
मालवण : दैवज्ञ भवन – सायंकाळी ४.०० वा.
वेंगुर्ले : साई दरबार सभागृह – दुपारी ३.३० वा.
सावंतवाडी : बॅ. नाथ पै सभागृह, नगरपरिषद – दुपारी ३.३० वा.
– अधिक माहितीसाठी संपर्क –
श्री. शंकर निकम, सनातन संस्था (मो. ७५८८५६९४३३)
ADVT –




