राष्ट्रनिर्मितीच्या विचारांना ‘मन की बात’मधून मिळाली नवी ऊर्जा! : भाजपा युवा नेते विशाल परब. ; सावंतवाडीत ‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात, युवा नेते विशाल परब यांचा पुढाकार.

सावंतवाडी : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या प्रेरणादायी कार्यक्रमाने देशभरातील जनतेच्या मनात राष्ट्रप्रेम, समाजसेवा आणि विकासाचा संदेश सातत्याने रुजविला आहे. हा कार्यक्रम केवळ संवाद नसून देशवासीयांच्या भावना, अपेक्षा आणि सहभाग यांना दिशा देणारे प्रभावी व्यासपीठ ठरले आहे. त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी कार्यालय, सावंतवाडी येथे ‘मन की बात’ कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे भाजपा युवा नेते विशाल परब यांची संकल्पना, नियोजन आणि मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. त्यांच्या पुढाकारातून सावंतवाडी येथील भाजपा संपर्क कार्यालयात कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रनिर्माण, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, आत्मनिर्भर भारत, नवकल्पना, युवा शक्ती, सामाजिक बांधिलकी आणि जनसहभाग यांसारख्या विविध विषयांवर प्रेरणादायी विचार मांडले. प्रत्येक नागरिकाने आपल्या कर्तृत्वातून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, समाजहिताचे कार्य स्वीकारावे आणि सकारात्मकतेचा संदेश देत विकसित भारताच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या संकल्पनेला अधिक बळ देत विकसित भारताच्या दिशेने एकजुटीने वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून राष्ट्रहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

भाजपा युवा नेते विशाल परब यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक ‘मन की बात’ हे देशातील सामान्य नागरिकांना प्रेरणा देणारे आणि समाजपरिवर्तनाचा मार्ग दाखविणारे विचारमंच आहे. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून राष्ट्रहिताचे कार्य करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

सावंतवाडीतील भाजपा संपर्क कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवउत्साह संचारला असून, राष्ट्रहित, विकास आणि समाजसेवेचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी भविष्यातही अशाच उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles