नवी दिल्ली : गुजरात टायटन्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 60 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. दिल्लीने गुजरातला विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातने हे आव्हान 19 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता गमावून पूर्ण केलं. कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन ही जोडी गुजरातच्या विजयाची शिल्पकार ठरली. गुजरातने यासह प्लेऑफमध्ये धडक दिली. तसेच गुजरातच्या या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्सनेही प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय.
ADVT –
डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!