सावंतवाडी : सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीच्यावतीने सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहात न्यायालयीन बंदीवानांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला.
यावेळी सावंतवाडी न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश जे. एम. मेस्त्री, जिल्हा कारागृहाचे अधीक्षक सतीश कांबळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी संदीप एकशिंगे, सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीच्या आर्या अडुळकर, कारागृह हवालदार अर्जुन घोडके, संदीप शेटे, सुभेदार महादेव गवस आदी उपस्थित होते.
यावेळी दिवाणी न्यायाधीश जे. एम. मेस्त्री यांनी बंदीवानांना हक्क व अधिकार यांपूर्वी कर्तव्य हे श्रेष्ठ असते याबाबत सविस्तर मार्गदर्शन करताना कारागृहातील न्यायालयीन बंदीवानांना कायदेविषयक सहाय्य व सल्ला याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कारागृहाचे वरिष्ठ तुरुंग अधिकारी संदीप एकशिंगे यांनी केले. सुत्रसंचालन सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीच्या आर्या अडुळकर यांनी तर जिल्हा कारागृहाचे अधिक्षक सतीश कांबळे यांनी सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहातील न्यायालयीन बंदीवानांना कायदेविषयक जनजागृती शिबीर आयोजित केल्याबद्दल सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीचे आभार मानले.


