पुरस्काराची रक्कम कोकण जनविकास समितीला.
मुंबई / कणकवली : सिंधुदुर्ग (वेंगुर्ले ) सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार संजय परब यांना मुंबई पत्रकार संघाचा प्रतिष्ठेचा उत्कृष्ट क्रीडा पत्रकार पुरस्कार प्राप्त झाला असून मुंबई येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात संजय परब यांना भारताचे विख्यात हॉकीपटू धनराज पिल्ले यांच्या हस्ते सदर पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुंबई पत्रकार संघाच्या क्रीडा पुरस्कार समितीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे पहिले मिस्टर इंडिया कबड्डीपटू विजू पेणकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, संघाचे कार्यवाह व पुरस्कार समितीचे उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के, पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर,विश्वस्त देवदास मटाले,सुरेश वडवलकर,प्रा.हेमंत सामंत, दिवाकर शेजवळ, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुंबईतील इतर क्रीडा पत्रकारांनाही विविध पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुरस्काराची रक्कम कोकण जनविकास समितीला
संजय परब यांनी या पुरस्काराची मिळालेली दहा हजार रुपयाची रक्कम त्यांनी
कोकण जनविकास समितीला दिला. कोकण जनविकास समिती कोकणात गेली काही वर्षे विविध कामे आणि आंदोलने करत आहेत. या कामांना थोडीबहुत चालना मिळावी आणि आपल्या सोबत्यांचा उत्साह वाढावा हा हेतू ही रक्कम जनविकास समितीला देण्यामागे आहे. असे श्री परब यांनी सांगितले. त्याचबरोबर जनविकास समितीचे प्रभाकर नारकर यांना याच कार्यक्रमात स्टेजवर बोलवून सदर रकमेचा धनादेश त्यांच्याकडे सोपवण्यात आला.
[2:17 PM, 5/21/2025] Ajay Kandar Writer: कृपया बातमी घ्यावी


