सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार पाच दिवसात झालेल्या पावसात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे संपूर्ण जिल्ह्यातील वीज ग्राहकांना नाहक अंधारात रहावे लागले आहे. कित्येक वीज ग्राहकांचे, व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनता संतप्त असून त्याचाच परिणाम म्हणजे वेंगुर्ला येथील वीज ग्राहकांचा झालेला आक्रोश व महावितरणच्या वेंगुर्ला विभागातील कामचुकार दोन अधिकाऱ्यांचे केलेले निलंबन.
याच पार्श्वभूमीवर वेंगुर्ला येथील वीज ग्राहकांनी महावितरणच्या कारभाराचा निषेध म्हणून या महिन्याचे वीज बिल न भरण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. अशीच भूमिका जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये सुद्धा घेण्याचा निर्णय वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग व व्यापारी महासंघाने घेतली आहे. याबाबतची जाहीर पत्रकार परिषद आज शनिवार दिनांक २४/५/२०२५ रोजी सायंकाळी ठीक ४.०० वाजता, रेस्ट हाऊस सावंतवाडी येथे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात येणार आहे.
तरी सर्व तालुक्यातील वीज ग्राहक संघटनेच्या व व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग आणि व्यापारी महासंघाकडून करण्यात येत आहे. सर्व पत्रकार बंधूंनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष/सचिव, वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग तसेच अध्यक्ष /कार्यवाह, व्यापारी महासंघ, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग, व्यापारी महासंघ यांची आज सावंतवाडीत संयुक्त पत्रकार परिषद.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


