Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

बापरे..! – चक्क पोलीस अधिकाऱ्यावर टोळक्याचा कोयत्यानं हल्ला.! ‘हे’ शहर हादरलं.

पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गेल्या काही वर्षांपासून कोयता गँगची मुजोरी वाढल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था अनेकदा राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. पुण्यात आज भांडण सोडवायला गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्यानं हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील जखमी पोलीस अधिकाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

टोळक्याचा अधिकाऱ्यावर हल्ला –

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील रामटेकडी परिसरात सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला आहे. रामटेकडी परिसरात भांडण सुरु असताना एका टोळीतील तरुणाला पकडण्यासाठी गेले होते. यावेळी टोळक्यानं त्याच अधिकाऱ्यावर हल्ला केला आहे. वानवडी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकांवर टोळक्यानं कोयत्यानं हल्ला केला. या मध्ये जखमी झालेल्या अधिकाऱ्याचं नाव रत्नदीप गायकवाड असं आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील रामटेकडी परिसरात भांडण सुरु होतं. ते भांडण सोडवण्यासाठी आणि त्यातील एका टोळीतील तरुणाला पकडण्यासाठी पोलीस गेले होते. यावेळी टोळक्यानं थेट पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात हल्ल्यात जखमी पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड जखमी झाले. ते वानवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आहेत. त्यांच्यावर टोळक्यानं कोयत्यानं हल्ला केल्यानं खळबळ उडाली आहे.

पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे. वानवडी पोलीस स्टेशनचे एपीआय रत्नदीप गायकवाड ससानेनगर पेट्रोलिंग करत असताना  दोन मोटारसायकल चालकांमध्ये वाद होत असल्याचं  निदर्शनास आलं. एपीआय वाद सोडवण्यासाठी गेले असता निहाल सिंग टाक या आरोपीनं हल्ला केला. निहाल सिंग टाक फरार असून त्याचा शोध सुरु आहे.

निहाल सिंग आणि राहुल सिंग असे या आरोपींची नावं असून हे दोघे आरोपी रेकॉर्ड वरचे असून याआधी त्यांनी अनेक गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यांच्याकडे याआधी पिस्तूल मिळून आले होते.

टोळक्यांवर पोलीस कठोर कारवाई करणार? 

वानवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर टोळक्यानं हल्ला केला यामध्ये ते जखमी झाले. रत्नदीप गायकवाड यांच्यावर आता उपचार सुरु आहेत.  पुण्यातील रामटेकडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. आता पुणे पोलीस या घटनेप्रकरणी संबंधित टोळक्यावर काय कारवाई करणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. कोयता गँगनं दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याच्या अनेक घटना यापूर्वी उघडकीस आल्या होत्या. पोलिसांनी यापूर्वी कारवाई करुन देखील टोळक्यांचा पूर्णपणे बंदोबस्त होत नसल्याचं चित्र आहे. आज पुणे शहरात ही घटना घडल्यानंतर पोलीस कठोर भूमिका घेणार का हे पाहावं लागणार आहे.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles