सावंतवाडी : नेमळे गावडेवाडी येथील शेतकरी दत्ताराम (तातो) राघोबा मालवणकर यांच्या मालकीची दगडी बांधकाम केलेली शेतविहीर विहीर सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कोसळली. मालवणकर यांनी दहा वर्षा पूर्वी सदर दगडी विहीर बँकेकडून कर्ज घेऊन बांधली होती. या विहिरीचा उपयोग ते माड बागायती, आंबा कलम तसेच शेतीसाठी करत असत. उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या काळात आजूबाजूची कुटुंबेही याविहिरीचे पाणी पीत असत. सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ही शेत विहीर कठड्यासहित कोसळून जमीन दोस्त झाली. यामुळे शेतकरी दत्ताराम मालवणकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी शेतकरी मालवणकर यांनी त्वरित नेमळे ग्रामपंचायतिला कळवून अतिवृष्टीमुळे कोसळलेली विहीर पुनःश्च बांधून मिळावी, अशी मागणी नेमळे ग्रामपंचायतीकडे केली. यावेळी नेमळे ग्रामसेवक श्री. चौहान, तलाठी श्री. पोळ, सरपंच दीपिका भैरे, उपसरपंच सखाराम राऊळ, लिपिक राजा गवस यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.
नेमळे येथील शेतकरी दत्ताराम मालवणकर यांची शेतविहीर अतिवृष्टीमुळे कोसळली.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


