Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनियमित व पूर्णपणे बंद असलेला वीज पुरवठा तात्काळ सुरू करा ! ; आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनतर्फे महावितरण अधीक्षक अभियंता यांना निवेदन सादर.

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये विशेषत: ग्रामीण भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. अनियमित वीज पुरवठ्यामुळे अनेक व्यावसायिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच शेतकरी व कष्टकरी बांधवांची विद्युत उपकरणांची हानी होऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही होत आहे.  मागील आठवड्यापासून अनेक गावातील वीजपुरवठा पूर्णतः बंद आहे. ज्यामुळे विविध व्यवहारही ठप्प झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाचा जिल्हाभरात पूर्णपणे बोजवारा झालेला आहे. यामुळे अतिशय गंभीर परिस्थितीचे भान राखत तात्काळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनियमित व पूर्णतः बंद असलेला वीजपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग या संस्थेने महाराष्ट्र वीज वितरण कंपनी सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता श्री. राख यांना निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी, उपाध्यक्ष आनंद कांडरकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. मानसी परब, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रा. रूपेश पाटील, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप सुकी, सदस्या कु. सिध्दी पारकर, कु.दर्शना राणे आदी उपस्थित होते.

दरम्यान, आपल्या निवेदनात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनने आपण दिलेल्या सदर निवेदनाची महावितरण कंपनीने तात्काळ दखल घेऊन त्वरित सुधारणात्मक उपाययोजना करण्यात यावी. तसेच ग्रामीण भागातील रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि अखंड वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी  विनंती केली आहे.  सदर निवेदनाची प्रत कुडाळ – मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे तसेच सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनाही पाठविण्यात आली आहे, असे जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी यांनी सांगितले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles