सावंतवाडी : काल दिनांक 28/5/25 रोजी रात्री 8.30 च्या सुमारास अंबाडे ता.आजरा येथील काही इसम 04 बैल निर्दयपणे, टॅग नसलेले वगैरे असे चालवीत घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यावरून आंबोली दुरक्षेत्र स्टाफ यांनी गेळे गावी त्यांना थांबवून त्यांची चौकशी केली असता पांडुरंग बापू पाटील, दशरथ बाळू पाटील, अशोक शांताराम पाटील, रमेश सीताराम कांबळे, यशवंत बापू राणे (सर्व राहणार अंबाडे, तालुका – आजरा, जिल्हा- कोल्हापूर) हे 4 गोवंश सावंतवाडी ते अंबाडे, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर असे चालवित घेऊन जात होते. प्राण्यास निर्दयतेने वागणूक व प्राणी संरक्षण कायद्यानुसार त्यांचेवर गुन्हा दाखल करून 4 गोवंश हे सुरक्षिततेकरिता ताब्यात घेऊन गोशाळेत जमा करणेची कार्यवाही केली आहे.
सदरची कारवाई स्थानिकांच्या मदतीने सावंतवाडी पोलिस स्टेशन नेमणुकी हेड कॉन्स्टेबल रामदास जाधव, दीपक शिंदे, लक्ष्मण काळे, मनीष शिंदे वगैरे पथकाने केली.
लोकांनी कोणत्याही प्रकारे अवैध जनावरे वगैरे वाहतूक करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले असून अशा प्रकारे मिळून आल्यास रीतसर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्याचप्रमाणे कोणीही अशा प्रकारची गोवंश वाहतूक बाबतीत माहिती असल्यास पोलिसांना संपर्क करावा परिसर कोणतीही अयोग्य कृती करू नये. कोणत्याही प्रकारे वाहतूक करणारे किंवा इतर लोकांविषयी माहिती दिल्यास त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
बैलांची अवैध वाहतूक प्रकरणी आजरा तालुक्यातील ५ जणांवर गुन्हा दाखल. ; सावंतवाडी पोलिसांची कडक कामगिरी.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


