सावंतवाडी : सावंतवाडी हे पर्यटनाचं आकर्षण केंद्र ठरले पाहिजे. मोती तलाव हा याचा मुख्य आकर्षण बिंदू आहे. त्यादृष्टीने या कारंजासह बोटींग, तलावकाठी खाऊगल्ली, योगा सेंटर आदीही प्रकल्प सुरू होणार आहेत. ऐतिहासिक राजवाडा, लाकडी खेळणी, हेल्थ पार्क, शिल्पग्राम आदी गोष्टी इथे आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पर्यटन क्षेत्रात हे शहर आकर्षण ठरेल असा विश्वास माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. ऐतिहासिक मोती तलाव येथे सुरु होत असलेल्या ‘म्युझिकल फाऊंटन’ची पाहणी श्री. केसरकर यांनी केली. या संगीत कारंजाच्या मनमोहन नजराण्याचा आनंद त्यांनी यावेळी घेतला. लवकरच हा कारंजा सुरू करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात हे शहर पर्यटन क्षेत्रातील आकर्षण ठरेल असा विश्वास श्री. केसरकर यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

म्हणाले, साडेचार कोटींचा हा कारंजा असून याच्या ट्रायल्स सुरू आहेत. त्या यशस्वी झाल्यानंतर हा संगीत कारंजा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रसाद महाले, प्रतिक बांदेकर, नंदू शिरोडकर, शैलैश मेस्त्री, सचिन मोरजकर आदी उपस्थित होते.


