कुडाळ : कुडाळ – मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ एमआयडीसी मधील काही महत्त्वाच्या प्रलंबित समस्याबाबत चर्चा करुन त्या तात्काळ सोडविण्यासाठी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्या समवेत विशेष बैठकीचे आयोजन केलेले होते. आमदार म्हणून निवडून आल्यावर त्यांची ही दुसरी बैठक.
असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी या औद्योगिक वसाहतीचा सगळ्यात महत्त्वाचा आणि ऐरणीवर असलेला प्रश्र्न म्हणजे विज समस्या. दिवसेंदिवस नव उद्योजकांची संख्या वाढत आहे पण वीज पुरवठा नसल्याने ते आपला उद्योग सुरू करू शकत नाही. तसेच आता जे उद्योग कार्यरत आहेत त्यानाही आवश्यक वीजपुरवठा होत नसल्याने नुकसान सहन करावे लागत आहे. त्यासाठी या औद्योगिक वसाहतीत नव्याने विज वितरण कंपनीचे सबस्टेशन होण्याची गरज आहे. मा. आमदार निलेश राणे याबाबत आपण या विषयात जातीने लक्ष घालून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील जेणेकरून या औद्योगिक वसाहतीला एक विकासाच्या द्रुष्टीने सकारात्मक वातावरण निर्माण होईल. तसेच काही उद्योजकांच्या भूखंडाबाबत प्रलंबित असलेल्या समस्याचाही उहापोह करण्यात आला त्यावर आपण संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन कार्यवाही करण्याबाबत आमदार राणे यांनी आश्वासित केले.
यावेळी कुडाळ औद्योगिक वसाहतीत असोसिएशनच्या वतीने इंडस्ट्रीयल एक्सपो २०२६ चे आयोजन करण्याबाबतची संकल्पना असोसिएशनचे कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर यांनी मांडली यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी आमदार निलेश राणे यांनी दाखवलेली असून त्याबाबतची रूपरेषा ठरवण्यास सांगितली आहे.
आपल्या समारोपाच्या संबोधनात आमदार निलेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात ही या जिल्ह्यातील त्यातल्या त्यात मोठी औद्योगिक वसाहत आहे त्याचा विकास झाला पाहिजे तरच येथील स्थानिकांना रोजगार मिळेल यासाठी या पुढच्या काळात असोसिएशनच्या सहकार्याने आपण प्रयत्नशील राहाणार असल्याचे सांगितले.
यावेळी श्री दत्ता सामंत, श्री संजय आंग्रे, असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर, जेष्ठ सल्लागार श्री आनंद बांदिवडेकर, पदाधिकारी श्री राजन नाईक, शशिकांत चव्हाण, संतोष राणे, श्री कुणाल ओरसकर, प्रमोद भोगटे , श्री अमीत वळंजू, उदय शिरोडकर, श्री अशफाक शेख आदी उपस्थित होते.
कुडाळ ‘MIDC’ च्या विकासासाठी कटिबद्ध ! : आमदार निलेश राणे यांची ग्वाही.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


