सावंतवाडी : सावंतवाडी येथील वैश्यवाडा येथे गटाराचे काम चालू आहे. सदर काम परप्रांतीय मजूर करत आहेत. मात्र ज्या ठिकाणी काम चालू आहे, अशा ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते आणि या रहदारीच्या रस्त्यावर परप्रांतीय कामगार आपल्या लहान मुलांना अर्थात ज्यांना नीट चालता पण येत नाही, अशा मुलांना बिनधास्तपणे रस्त्यावर खेळण्यासाठी सोडतात. अशावेळी चुकून त्या चिमुकल्याचा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण?, असा प्रश्न सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांनी उपस्थित केला आहे.
तरी या संदर्भात पोलिसांनी सदर ठेकेदाराला व त्या मुलांच्या पालकांना सूचना करून असे प्रकार पुन्हा घडल्यास त्यांच्यावर कडक कारवाई कररावी, अशी मागणी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी केली आहे.
जाहिरात –



