सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहक मे महिन्यात आलेल्या अवकाळी पावसातील विविध वीज समस्यांनी हैराण झाले असून महावितरणच्या वीज सेवांचा पुरता बोजवारा उडालेला आहे. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणचे अधीक्षक अभियंता साळुंखे यांची बदली होऊन नूतन अधीक्षक अभियंता पदी श्री अभिमन्यू राख यांची नियुक्त होऊन त्यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे. जिल्ह्यातील वीज समस्या बाबत तत्कालीन अधीक्षक अभियंता यांना माहिती होती, परंतु अल्पावधीतच त्यांची बदली होऊन नूतन अधीक्षक अभियंत्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्यातील वीज समस्या त्यांच्या नजरेत आणून देणे क्रमप्राप्त आहे जेणेकरून येत्या पावसाळ्यात जिल्हा अंधारात राहू नये. यासाठीच सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व जिल्ह्यातील वीज ग्राहक सोमवार दिनांक ०२ जून २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात त्यांची भेट घेणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा गेल्या आठ दहा दिवसांपासून अवकाळी पावसात अंधारात चाचपडत आहे. जिल्ह्यात शून्य वीज चोरी, वीज थकबाकी अशा समस्या नसतानाही वीज ग्राहकांना चार चार दिवस अंधारात राहण्याची वेळ येते. सावंतवाडी सारख्या शहरात देखील ७८ तास वीज पुरवठा खंडित होता. आजही शहरात दिवसातून पाच ते दहावेळा तर तालुक्याच्या बहुतांश गावांमध्ये वीज खंडित होण्याचे प्रकार सुरू आहेत. अशीच परिस्थिती दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ आदी तालुक्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वीज समस्या जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता यांच्या नजरेत आणून देणे क्रमप्राप्त आहे. यासाठीच वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांनी तसेच जिल्ह्यातील वीज समस्यांनी प्रभावित असलेल्या वीज ग्राहकांनी, गावागावातील ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यांनी आपापल्या गावातील वीज समस्या लेखी स्वरूपात, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायत पैकी कोणत्याही गावात ज्या ज्या ठिकाणी नवीन सब स्टेशन, नवीन फिडर, नवीन रोहित्रे, नवीन पोल, नवीन वायर, नवीन केबल, रेग्युलर जुन्या पद्धतीचे मीटर ( स्मार्ट मीटर नको ) तसेच भूमिगत केबल लाईन आवश्यक असल्यास त्याची सविस्तर यादी आणि तपशील मागणी पत्रासहित न विसरता सोबत घेऊन कुडाळ येथे उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना सोमवारी घेणार महावितरणच्या नूतन अधीक्षक अभियंता यांची भेट.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


