कीव : रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध वाढण्याची शक्यता आहे. यूक्रेननं रशियाच्या दोन एअरबेसवर हल्ला केला आहे. ओलेन्या आणि बेलान्या या एअरबेसवर यूक्रेननं हल्ला केला आहे. यूक्रेनच्या सैन्यानं यासाठी ड्रोनचा वापर केला. ज्या एअरबेसवर हल्ला झाला ते ठिकाण रशिया आणि यूक्रेनच्या सीमेपासून खूप अंतरावर आहे. यूक्रेनच्या मीडिया रिपोर्टसनुसार हा हल्ला यूक्रेनच्या सैन्याकडून करण्यात आलेला मोठा हल्ला होता. यूक्रेननं या एअरबेसवर हल्ला केला कारण रशियाचा या एअरबेसचा वापर हल्ले करण्यात आला होता.
यूक्रेनकडून सांगण्यात आलं की त्यांनी रशियाच्या आतमधील एअरबेसवर ड्रोन हल्ले करण्यात आला. ज्यामध्ये 40 हून अधिक रशियन बॉम्बर्सला उद्धवस्त केलं आहे. या विमानांचा वापर रशियाकडून यूक्रेनवर बॉम्ब हल्ला करण्यासाठी केला जात होता. या विमानांद्वारे यूक्रेनवर हल्ला करण्यात आला होता.
यूक्रेनच्या सुरक्षा सेवेच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं की त्यांच्या ड्रोननं रशियाच्या क्षेत्रात जाऊन बॉम्बर्स विमानांवर हल्ले केले. Tu-95, Tu-22 आणि A-50 सारख्या हेरगिरी करणाऱ्या विमानाला नुकसान पोहोचवलं. एसबीआयनं म्हटलं बेलाया एअरबेसवर हल्ला केला. जो रशियातील इर्कुत्सक भागातील आणि अलावा येथील ओलेन्या एअरबेसवर हल्ला केला आहे. मात्र, याला अधिकृत रित्या दुजोरा मिळाला नाही.
यूक्रेनकडून ज्या विमानांवर हल्ले करण्यात आले ती रशियासाठी महत्त्वाची आहेत. Tu-95 हे 1950 च्या दशकातील जुनं विमान आहे. हे विमान अजून देखील क्रूझ मिसाईल घेऊन जाण्यास सक्षम आहे. जे दूर अंतरावरच्या शहरांना लक्ष्य करु शकतं.यामध्ये जेट इंजिनच्या जवळ प्रोपेलर लावलेले असतात. ते दूर अंतरावरील लक्ष्य भेदू शकतात.
Tu-22 हे अति वेगवान विमान आहे, जी प्रामुख्यानं मिसाईल घेऊन जाऊ शकतं, या विमानातून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांना यूक्रेनसाठी सोपं नाही. अमेरिका आणि यूरोपच्या अत्याधुनिक सुरक्षा सिस्टीमचा वापर त्यासाठी यूक्रेनला करावा लागतो. A-50 सारखं दुर्मिळ, महागडं आणि हेरगिरी करणारं विमान आहे. रशियाकडे अशी 10 विमानं आहेत. ज्याची किंमत 350 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे.
Tu-160 हे जगातील सर्वात मोठं बॉम्बवर्षाव करणारं विमान आहे. 1980 च्या दशकात याची निर्मिती झाली. रशियाच्या वायूसेनेतील सर्वात धोकादायक विमान आहे. रशियाची विमानं दररोज रात्री शहरांवर बॉम्बवर्षाव करत असल्यानं ड्रोन हल्ले करत होते. ड्रोन हल्ले केल्यानं रशियाकडून होणारे हल्ले कमी होतील, असा अंदाज यूक्रेनला आहे.
रशिया आणि इतर देशांकडून या हल्ल्याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. यातील काही माहितीमध्ये बदल होऊ शकते. ड्रोन हल्ले जर खरे ठरले तर यूक्रेनचा रशियावरील सर्वात मोठा हवाई हल्ला मानला जाईल. यूक्रेनकडून ड्रोन हल्ले चालू ठेवले जातील, असं म्हटलं.


