यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात होणार कार्यक्रम संपन्न.
सावंतवाडी : दहावी बारावीच्या परीक्षेत ७० टक्के च्या वर गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांंचा गुणगौरव समारंभ ७ जून रोजी संध्याकाळी चार वाजता यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल शिल्पग्राम सावंतवाडी येथे होणार असून यावेळी कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब,जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनीष दळवी, युवराज लखमराजे भोसले यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली नसेल त्यांनी कार्यक्रमापूर्वी अर्धा तास उपस्थित राहून नाव नोंदणी करावी असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.
दरवर्षी दहावी बारावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येतो,यावर्षी 70% च्या वरील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे ,तसेच 90% च्या वर गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान यावेळी संपन्न होणार आहे.
सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठा समाज बांधवांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार होणार आहे, हा कार्यक्रम खासकील वाडा माधव भाटले येथील शिल्पग्राम शेजारी असलेल्या यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात सायंकाळी चार वाजता संपन्न होणार आहे.
तरी ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत नाव नोंदणी करावी तसेच कार्यक्रमाच्या पूर्वी उपस्थित राहून नाव नोंदणी करावी, असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे


