कुडाळ : आज दिनांक 02/06/2025 रोजी दुपारी 03.00 वाजताचे दरम्याने एस.टी. बस स्टँड कुडाळ येथे एक अनोळखी पुरुष हा बेशुद्ध अवस्थेत मिळून आलेला आहे. त्यास ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे प्रथम उपचारासाठी दाखल केले होते. तेथून त्यास अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग ओरोस येथे रेफर करण्यात आले असून सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात औषधोपचार चालू आहेत. त्याच्या उजव्या हाताच्या पंजाजवळ हिंदी मध्ये माँ आणि मनगटावर आई असे गोंदलेले आहे. त्याची प्रकृती स्थिर असून तो सद्यस्थितीत नाव पत्ता सांगण्याच्या किंवा जबाब देण्याच्या स्थितीत नाही.
तरी सदर व्यक्तीचे नाव, गाव किंवा वारसांची माहिती मिळाल्यास कृपया खालील संपर्क क्रमांकावर कळवावे, असे पोलिसांकडून करण्यात आले आहे.
1. कुडाळ पोलीस ठाणे 
02362222533
2. HC प्रमोद काळसेकर 
8605724105
3. PC योगेश मुंढे 
9923968067



 

