दोडामार्ग : सध्या महाराष्ट्रात शैक्षणिक प्रवेशाची लगबग सुरु आहे. असे असताना दोडामार्ग तहसिलदार मात्र सुशेगाद सुट्टी उपभोगत आहेत, त्यांनी खुशाल फिरावे मात्र दोडामार्ग तहसिलदार पदातून कार्यमुक्त व्हावे, तालुक्यातील महसुली गाऱ्हाणी कुणाकडे मांडावीत, तालुक्यातील ५८ गावांवर महसुली अंकुश कोणी ठेवावा हा प्रश्न निर्माण झाला आहे, अनेकवेळा दोडामार्ग मध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते, अशा आपत्कालीन परिस्थितीत दोडामार्ग तहसीलदार महोदय हे दोडामार्ग तहसीलदार पदाची पाटी घेवून हिंडत आहेत, अशा बेजबाबदार अधिकाऱ्यास शोधून त्याला खुर्चीवर बसवणाऱ्यास ५१ हजाराचे बक्षीस देवू असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
दोडामार्ग तहसीलदार हाजिर हो.! ; चार महिन्यापासून गायब झालेल्या तहसीलदारांना शोधून आणणाऱ्यास ५१ हजार रुपयांचे बक्षीस.! : उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


