सावंतवाडी : सावंतवाडीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा होणार आहे. संस्थेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून मुकुंद सीताराम कामत मार्गदर्शन करणार आहेत, तर संस्थेचे प्राचार्य प्रशांत जयानंद मठकर यांच्यासह उपप्राचार्य, गटनिदेशक आणि सर्व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. संस्थेने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम येत्या ६ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे.
सावंतवाडी येथील जयानंद मठकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिन सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार !
0
22
Previous article