भोसले इन्स्टिट्यूटचा पुन्हा एकदा फडकवला यशाचा झेंडा!, सीमेन्ससारख्या बहुराष्ट्रीय कंपनीत ७ विद्यार्थ्यांची दमदार निवड. ; गुणवत्तेचा ठसा पुन्हा अधोरेखित.

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचा आणि तांत्रिक कौशल्याचा आणखी एकदा ठसा उमटवत बहुराष्ट्रीय कंपनी सीमेन्समध्ये स्थान मिळवले आहे. डिप्लोमा विभागातील तब्बल ७ विद्यार्थ्यांची सीमेन्स कंपनीच्या गोवा युनिटसाठी निवड झाल्याने संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पूल कॅम्पस इंटरव्ह्यू प्रक्रियेत मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल विभागातील एकूण २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विविध तांत्रिक चाचण्या, कौशल्य मूल्यांकन आणि मुलाखतींच्या कठीण टप्प्यांतून यशस्वीपणे वाटचाल करत ७ विद्यार्थ्यांनी अंतिम निवडीत आपले स्थान निश्चित केले.
सीमेन्सच्या गोवा युनिटमध्ये उच्च दर्जाची इलेक्ट्रॉनिक आणि ऊर्जा व्यवस्थापन उत्पादने, फॅक्टरी ऑटोमेशन सिस्टीम्स, मायक्रोबॉक्स पीसी, प्रिंटेड सर्किट बोर्ड्स, स्विचगियर, प्रोटेक्शन रिले तसेच सबस्टेशन ऑटोमेशन उपकरणांचे उत्पादन केले जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या कार्यपद्धतींसाठी हे युनिट विशेष ओळखले जाते.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला वार्षिक साडेतीन लाख रुपयांचे आकर्षक पॅकेज देण्यात आले असून, त्यांच्या करिअरच्या नव्या पर्वाची ही दमदार सुरुवात मानली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या या अभिमानास्पद यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले तसेच टीपीओ हेड मिलिंद देसाई यांनी त्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
“गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे हे यशस्वी फलित असून, भोसले इन्स्टिट्यूट भविष्यातही अशाच यशोगाथा घडवत राहील,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles