उद्धव ठाकरेंच्या पक्षात महाफुट, अमित शाहांची महाराष्ट्रात एन्ट्री! ; राज्यात दोन दिवस तळ ठोकणार, नेमकं काय घडतंय?

मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. सहा खासदारांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली आहे. हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. हे खासदार आता लवकरच स्वतंत्र गटाची स्थापना करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची पत्रकार परिषद पार पडली होती, या पत्रकार परिषदेनंतर ठाकरे गटाचे खासदार नाराज झाले आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांबद्दल अपशब्द वापरण्यात आले, त्यानंतर हे सर्व खासदार चांगलेच नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता उद्याच हे सर्व खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

दरम्यान एकीकडे शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, तब्बल 6 खासदार फुटले आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री हे आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. अमित शाहा 19 आणि 20 जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. 20 जूनला त्यांची पोलीस परेड मैदान येथे जाहीर सभा होणार आहे.  या सभेची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. या सभेसाठी मंडप उभारण्याचं काम सध्या सुरू असून उद्या दुपारपर्यंत पूर्ण केल जाणार आहे.  धन्यवाद अमितजी असं या सभेला नाव देण्यात आलं असून, या सभेला महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असं नियोजन करण्यात आलं आहे. कोल्हापुरात सध्या अंबाबाई विकास आराखड्याचे काम सुरू आहे या विकास आराखड्यासाठी केंद्रातून मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे.

या निधीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाहा यांचा मोठा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी ही सभा होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटात पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहा काही बोलणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles