सिंधुदुर्गमध्ये गौड सारस्वत ब्राह्मण समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ! ; ८ जूनपर्यंत नावे नोंदविण्याचे आवाहन.

सावंतवाडी : गौड सारस्वत ब्राह्मण समाज, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या समाजबांधवांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत नाडकर्णी यांनी या उपक्रमाची माहिती दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव व्हावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी येत्या ८ जून २०२५ पर्यंत आपली नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेने केले आहे.

या सत्कार समारंभासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वडील किंवा आई हे संस्थेचे सदस्य असणे आवश्यक आहे. इच्छुक व्यक्तींनी विद्यार्थ्याचे गुणपत्रक (छायाप्रत) आणि संपर्क क्रमांक यासह आवश्यक कागदपत्रे श्री. संतोष हनुमंत पई, सबनीसवाडा, सावंतवाडी या पत्त्यावर प्रत्यक्ष पाठवावीत किंवा ९४२३२६७०१८ या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे जमा करावीत.

गौड सारस्वत ब्राह्मण समाजाने शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच भरीव योगदान दिले आहे आणि हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्याच परंपरेचा भाग आहे. या सत्कारामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवी प्रेरणा निर्माण होईल आणि समाजासाठी ही गौरवाची बाब ठरेल, असे मत श्री. नाडकर्णी यांनी व्यक्त केले.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles