Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

निगुडे पाणीपुरवठा नळ योजनेचे तीन तेरा !, ग्रामसभा ठरली वादळी ! ; निगुडे सरपंच, उपसरपंच यांची जातीवाचक धमकी ? : माजी उपसरपंच गुरूदास गवंडे यांचा आरोप.

सावंतवाडी : गाव मौजे निगुडे ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा 30 मे रोजी झाली. निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आयत्यावेळी येणाऱ्या विषयावर निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी पाणीपुरवठा संदर्भात विचारणा केली असता गेली नऊ महिने आपण नळ योजनेची बिले का काढली नाही? पाणीपुरवठा सुरळीत नाही.  २८ जानेवारीच्या तहकूब ग्रामसभेमध्ये नळ कर्मचारी भरती प्रक्रिया नव्याने राबवा. असं सांगितलं असताना देखील आपण हंगामी कर्मचारी यांना सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट केलात आणि आज त्या कर्मचाऱ्यांला चार वेळा ग्रामपंचायतींच्या माध्यमातून नोटीसा देऊन तो स्वीकाराला तयार नाही. ग्रामपंचायत दप्तरी रेकॉर्ड, नळ योजनेचा सर्व त्याच्याजवळ आहे, असं ग्रामसभेमध्ये आपण मान्य करता या प्रश्नावर विचारणा केली असता तसेच ग्रामसभेमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेची बिले माफ करा, असा ठराव बहुमताने घेताना ग्रामसेवक टाळाटाळ करायला लागले.

यावेळी निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर व उपसरपंच गौतम जाधव हे त्या ठिकाणी सदरचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर जातीवाचक शब्दाचा उल्लेख करून त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला म्हणून ठराव घ्या, असे ग्रामसेवकांना सांगत होते.  यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष वासुदेव गावडे यांनी सरपंच यांना विचारले. या ठिकाणी तुम्हाला जातिवाचक वाक्य कोणी बोलले आहे का? उगाच काहीतरी बोलायचं तुम्ही बोलता आहात. तेव्हा ते गप्प राहिले. निगुडे ग्रामपंचायतीचा नळ कर्मचारी हा ग्रामपंचायतीत उपस्थित राहत नसून गेल्या जानेवारीपासून टीसीएल पावडर किंवा अन्य सर्व नळ योजनेचा रेकॉर्ड हे तो घेऊन घरी आहे. ते देण्यास टाळाटाळ करत आहे. हे ज्यावेळी ग्रामपंचायतीत उपस्थित करण्यात आलं, त्यावेळी सरपंचांना ग्रामस्थांनी सांगितलं की “त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा!, अशा प्रकारे रेकॉर्ड ग्रामपंचायत कसं काय तो बाहेर नेऊ शकतो? उद्या त्याची जबाबदारी कोणाची?” अशा अनेक विषयांवर निगुडे ग्रामपंचायतची ग्रामसभा वादळी ठरली.

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती अक्षता गोसावी, निगुडे माजी सरपंच समीर गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश सावंत, माजी उपसरपंच गुरूदास गवंडे, शर्मिला नाईक, दक्षता गावडे, शुभांगी निगुडकर, पुरुषोत्तम गावडे, गुरुदास निगुडकर, लक्ष्मी पोखरे, माजी सैनिक वासुदेव गावडे, माजी मुख्याध्यापक महादेव नाईक, ग्रामपंचायत सदस्य वर्षा निगुडकर, माजी सरपंच दिनेश राणे,अंगणवाडी सेविका प्रियांका राणे, रंजना सावंत, नूतन निगुडकर, आशा सेविका भाग्यलक्ष्मी मोरजकर, आरोग्य सेवक निळकंठ बांदवलकर, शुभदा गावडे, अरविंद नाईक, मयुरेश गावडे, सीआरपी संजना केसरकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजेश मयेकर अशा ३० ते ४० ग्रामस्थ सदर ग्रामसभेला उपस्थित होते. निगुडे नळयोजना पाणी पुरवठा योजना लोकांना मुबलक पाणी पुरवठा देऊ शकत नाही. परंतु सरपंच आणि उपसरपंच ग्रामपंचायतचे मानधन मिळावे, यासाठी ग्रामपंचायतमध्ये हजेरी लावतात, लोकांचे प्रश्न मिटवू शकत नाही, असा आरोपही त्यांनी केला. पाणी पुरवठा संदर्भात आम्ही वारंवार आवाज उठवत आहोत. आपण काम करण्यास अयशस्वी राहिलो, जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही, या उद्देशाने सरपंच व उपसरपंच यांनी हल्लीच शिंदे गटात प्रवेश केला, अशी टीका श्री. गवंडे यांनी आपल्या प्रसिद्ध माध्यमातून केली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles