सावंतवाडी : तालुक्यातील निसर्गाने संपन्न असलेल्या चौकुळगावातील जळवाडी या दुर्गम भागातील अनेक दिवसांपासून असलेली मागणी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली आहे.
येथील नागरिकांनी अनेक दिवस येथे समाज मंदिर व्हावे, यासाठी वारंवार मागणी केली होती त्यांची ही मागणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व संदीप गावडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाली आहे.

आज येथे समाजमंदिरच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी युवा नेते संदीप गावडे, चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे, बूथ अध्यक्ष संतोष गावडे, बूथ अध्यक्ष सोमा गावडे, चौकुळ विकास सोसायटी चेअरमन पी. डी. गावडे, दयानंद गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे, निहार शिरसाट यांसह ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


