सावंतवाडी : कोकणात पडणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. काजूचा हंगाम अजून संपायचा होता. कोकणातल्या सर्व झाडांना चैत्र पालवी येते तसेच काजूच्या झाडांना येते काजूच्या झाडांना येणारी ही नवीन पालवी व मोहर सुद्धा घेऊन येते या मोहरानेच मिळतात शेतकऱ्याला पाले काजू. या पाले काजूचं उत्पन्न एकूण काजूच्या उत्पन्नाच्या बारा ते पंधरा टक्के पेक्षा जास्त असते त्याशिवाय ते अत्यंत चविष्ट असतात आणि हंगामाच्या शेवटी आल्याने त्यांना रेट सुद्धा चांगला मिळतो परंतु यावर्षी काजू बागायतदारांचे अवकाळी पावसामुळे पाले काजूचे नुकसान झाल्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

हापूस आंबा हंगाम आता संपत आला होता परंतु अजून 20% आंबा काढावयाचा होता आत्ताच कॅनिंगचा हंगाम जोमात असणार होता .त्याशिवाय रत्ना सिंधू गोवा मानकूर पायरी करेल आधी सर्वोत्कृष्ट आंबे मे महिन्याच्या शेवटी तयार होतात. यंदा हा सर्व आंबा अक्षरशः कुजून गेला.
कोकम चा हंगाम तर पाच-सहा मे नंतरच सुरू होतो आणि तो आठ दहा जून पर्यंत चालतो परंतु या वेळेस कोकम थोडा लेट होता आणि पिकायला लागल्यावरच अतोनात सर्व कोकम सुद्धा वाया गेला आहे. यावर्षी त्यामुळे प्रक्रिया उद्योग आणि त्यावर आधारित उद्योग यांना फार मोठा फटका बसला आहे. स्थानिक लोकांना लागणारा उत्तम दर्जाचा आमसूल यावर्षी तयारच होणार नाही तसेच कोकम आगळ कोकम सरबत बनविणाऱ्या गृह उद्योगांचा सुद्धा फार मोठा तोटा होणार आहे. या अस्मानी संकटात शासनाने तात्काळ मदत करावी अशी शेतकरी आस बाळगून आहे.


